OBC असल्यानेच तिकीट नाकारले; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा आरोप

काँग्रेसने नुकतीच 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Priyanka Morya
Priyanka Morya Google

लखनऊ - काँग्रेस पक्षाची 'लड़की हूं, लड़ सकती हूं' कॅम्पेनची पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. इतर मागासवर्गीय असल्यानेच आपल्याला विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारण्याता आल्याचा गंभीर आरोप प्रियंका मौर्य यांनी केला आहे. यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीट वाटपावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत न्यूज 18 ने वृत्त प्रकाशित केले आहे.

मौर्य यांनी शुक्रवारी सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, 'मी दु:खी आहे कारण माझ्या परिसरात खूप मेहनत करूनही मला यूपी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. 'लड़की हूं, लड़ सकती हूं' या मोहिमेसाठी माझा चेहरा वापरण्यात आला होता.

यावेळी मौर्य यांनी सचिव संदीप सिंह यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करत माझा चेहरा, माझे नाव आणि माझे 10 लाख सोशल मीडिया फॉलोअर्स प्रचारासाठी वापरल्याचे म्हटले आहे. मात्र आगामी निवडणुकीसाठी तिकीट देताना ते दुसऱ्याला देण्यात आले. हा अन्याय आहे. मौर्य यांना लखनऊमधील सरोजिनी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. तर या जागेवर पक्षाने रुद्र दमन सिंह यांना संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारीच 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 50 महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com