Gurat Bridge Collapse: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना; कॉंग्रेस अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress president Mallikarjun Kharge on Gujrat morbi Cable Bridge Collapse

Gurat Bridge Collapse: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना; कॉंग्रेस अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...

नवी दिल्ली: गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असून मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. या आपगातात आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्या कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बचावकार्यात मदत करसाठी शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे.

गुजरातमधील मोरबी येथे झुलता पूल कोसळून झालेल्या दु:खद घटनेने खूप दुःख झाले. मी आवाहन करतो गुजरात कॉंग्रेसला बचाव कार्य आणि जखमींना मदत करण्यासाठी कामगारांनी शक्य ती मदत करा. माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत, असे ट्विट खर्गे यांनी केले आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray: 'उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा'; शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

दरम्यान या अपघातात ६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १००हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ही घटना घडली तेव्हा पुलावर शेकडो लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेतील मृत्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना गुजरातते मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान मोदी यांनी मदतीची घोषणा देखील केली आहे.

हेही वाचा: Gujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये नदीत पूल कोसळल्याने आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता