राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'ला नागरिकांनी दिली साथ

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींचा फायदा करून दिला. त्यामुळे यावरून स्पष्ट होते, की चौकीदार चोर है. मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना सरचिटणीस केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत.

लखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनौमध्ये रोड शोनंतर केलेल्या भाषणात चौकीदार चोर हैच्या घोषणा दिल्या. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींचा फायदा करून दिला. त्यामुळे यावरून स्पष्ट होते, की चौकीदार चोर है. मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना सरचिटणीस केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत. याठिकाणी काँग्रेसची विचारधारा असलेले सरकार आणण्यासाठी आम्ही प्रय़त्न करणार आहोत. लोकसभा निवडणूकीत हे काम करतीलच, पण त्यांचे मुख्य ध्येय विधानसभा निवडणूक आहे. 

लखनौ विमानतळापासून सुरु झालेल्या रोड शो काँग्रेस मुख्यालयापर्यंत सुरु होता. आगोदर बस आणि नंतर कारच्या टपावर बसून राहुल आणि प्रियांका यांनी रोड शो केला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांची उधळण करून नागरिकांनी यांचे स्वागत केले. प्रियांका गांधींचे विविध विशेषणे देऊन त्यांच्याकडे मोठा आशेने बघण्यात येत आहे. 

Web Title: Congress president Rahul Gandhi chants Chowkidar Chor hain in Lucknow