हर चीज में लिक है, चौकीदार विक है ; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मी देशाचा 'चौकीदार' असल्याचे सांगितले. त्यांच्या या 'चौकीदार' शब्दावरून आणि सतत होणाऱ्या डेटा लिकप्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''हर चीज में लिक है, चौकीदार विक है''.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मी देशाचा 'चौकीदार' असल्याचे सांगितले. त्यांच्या या 'चौकीदार' शब्दावरून आणि सतत होणाऱ्या डेटा लिकप्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''हर चीज में लिक है, चौकीदार विक है''.

narendra modi

फेसबुक डेटा लिकप्रकरणावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच देशाचे चौकीदार म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. फेसबुक डेटा लिकप्रकरण, आधारकार्डवरील डेटा लिकप्रकरण, दहावी परीक्षेचे पेपरफुटीप्रकरण, निवडणुकांच्या तारखा लिकप्रकरण, सीबीएसई बोर्डाच्या प्रश्नपत्रिका लिकप्रकरण यांसारख्या प्रकरणावर राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. ''डेटा लिक, आधार लिक, एसएससी एक्झाम लिक, इलेक्शन लिक, सीबीएसई पेपर्स लिक. हर चीज में लिक है, चौकीदार विक है. 

Web Title: Congress President Rahul Gandhi Criticizes Narendra Modi