'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

 ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच राफेल विमान करारात अनिल अंबानी यांच्या कंपनींचा समावेश का करण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : 

- राफेल विमानांच्या किंमतीवर अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले

- राफेल प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत?

- देशातील 30 हजार कोटी रुपयांची चोरी झाली. हा सर्व पैसा चोरांनी नेला.

- 'चौकीदार' चोर असल्याचे भारतातील जनतेला माहीत आहे

- राफेल प्रकरणाची चौकशी झाल्यास दोन नावं समोर येतील, एक नरेंद्र मोदी तर दुसरे अनिल अंबानी

- संरक्षणमंत्र्यांनी आपलं विधान सातत्याने बदललं

- कॅगचा हा अहवाल अद्याप पीएससीसमोर का आणला गेला नाही?, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.
 

Web Title: Congress President Rahul Gandhi Criticizes Prime Minister Narendra Modi and Anil Ambani on Rafel Deal