राहुल गांधींनी खासदारांना दिला विजयाचा मंत्र 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगताना विजयाचा मंत्र दिला. तर, "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधींनी समविचारी पक्षांशी मैत्रीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत कॉंग्रेसचे आघाडीचे राजकारण पुन्हा एकदा अधोरेखीत केले. 

सोळाव्या लोकसभेतील कॉंग्रेस संसदीय पक्षाची अंतिम बैठक आज झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दोन्ही सभागृहातील पक्ष खासदारांशी संवाद साधला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेदेखील या वेळी उपस्थित होते. तर पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल गांधींची संसदीय पक्षाची ही दुसरी बैठक होती. राहुल यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना सोनियांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. 

राहुल गांधी अथक प्रयत्न करत असून समान विचारसरणीच्या पक्षांशी ते चर्चा करत आहेत, अशा शब्दात सोनिया यांनी राहुल यांची प्रशंसा केली. नव्या पक्षाध्यक्षांनी संघटनेमध्ये ऊर्जा आणली असून त्यांच्या टीममध्ये तरुण आणि अनुभवी नेत्यांचा समन्वय आहे. प्रतिस्पर्धी (भाजप) अजिंक्‍य असल्याचे म्हटले जात होते. परंतु, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विजयाने कॉंग्रेसमध्ये नवी आकांक्षा जागविली आहे, असे सांगत सोनियांनी पक्ष खासदारांमध्ये उत्साह जागवला. या सोबतच मोदी सरकारवर त्यांनी कडाडून हल्लाही चढवला. 

भाजपच्या राजवटीत घटनात्मक संस्था उद्‌ध्वस्त केल्या जात असून राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. मतभेदाचा आवाज दडपला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात भय आणि संघर्षाचे वातावरण आहे. मोदी सरकार सातत्याने घटनात्मक मूल्य, सिद्धांतांची अवहेलना करते आहे. 
सोनिया गांधी, अध्यक्षा "यूपीए' 

कॉंग्रेस पक्षच भाजपच्या विचारसरणीचा पराभव करेल. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेला कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असून बेरोजगारी, नोटाबंदी आणि राफेल गैरव्यवहारामुळे मोदी सरकारची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. 
राहुल गांधी, अध्यक्ष कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com