राहुल गांधींनी अडवानींना दिला पुन्हा 'हात'

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

संसद भवनातील या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला अडवानीही आले होते. यावेळी राहुल गांधी अडवानींना गर्दीतून वाट काढून देताना दिसले.

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) संसद भवनात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा आदराने पुढे घेऊन जाताना दिसले.

संसद भवनातील या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला अडवानीही आले होते. यावेळी राहुल गांधी अडवानींना गर्दीतून वाट काढून देताना दिसले. राहुल यांचा एक अडवानींच्या पाठीवर होता, तर दुसऱ्या हाताने ते त्यांना रास्ता दाखवत होते. सोशल मिडीयावर ही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. असे पहिल्यांदाच झाले नसून, यापूर्वीही राहुल गांधी यांनी अडवानींना सन्मानाने वागणूक दिल्याचे समोर आले आहे.

या कार्यक्रमात राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले, पण त्यांनी बोलणे टाळले. यापूर्वी लोकसभेत अडवानी पहिल्या रांगेत एकटेच बसले असताना राहुल गांधींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार करत त्यांची विचारपूस केली होती. त्यानंतर संसदेवरील हल्ल्याच्या 16 व्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमातही अडवानींना त्यांनी मदत केली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president Rahul Gandhi gives respect to bjp leader Lal Krishna Advani