आघाडीबाबत शरद पवार-राहुल गांधींमध्ये दिल्लीत चर्चा

वृत्तसंस्था
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून, दोन किंवा तीन जागांवर अद्याप निश्चिती झालेली नाही. येत्या काही दिवसांत जवळपास सर्वच जागांवरील उमेदवार आणि जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बैठकांसह दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या बैठकांनाही सुरवात झाली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून, दोन किंवा तीन जागांवर अद्याप निश्चिती झालेली नाही. येत्या काही दिवसांत जवळपास सर्वच जागांवरील उमेदवार आणि जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बैठकांसह दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या बैठकांनाही सुरवात झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेऊन भाजप आणि शिवसेनेला आव्हान दिले आहे.

आज झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाळ हेही उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या हजर होत्या. वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेमुळे महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना प्रचाराबाबत स्पष्ट संदेश मिळणार आहेत. खर्गै यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress President Rahul Gandhi meets NCP Chief Sharad Pawar in Delhi