Loksabha 2019 : उर्मिलाच्या हातात काँग्रेसचा 'हात'; या मतदारसंघातून लढणार

Congress
Congress

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिला उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी संजय निरुपम यांच्यासह त्या आज सकाळी दिल्लीला रवाना झाल्या. राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी हे भाजपचे उमेदवार आहेत.

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे, तसेच आसावरी जोशी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, काँग्रेसने उर्मिला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com