सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांची वाराणसी येथे रोड शो दरम्यान प्रकृती खराब झाल्याने पुन्हा दिल्लीला परतावे लागले होते.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना  ताप आल्याने आज (मंगळवार) सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांची वाराणसी येथे रोड शो दरम्यान प्रकृती खराब झाल्याने पुन्हा दिल्लीला परतावे लागले होते. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title: Congress President Sonia Gandhi admitted to Sir Ganga Ram Hospital in Delhi