मोदींचा हा नवा 'राजधर्म' आहे का?; दलित अत्याचारावरुन सोनिया गांधींचे टीकास्त्र

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे

नवी दिल्ली- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अॅट्रोसिटी एका नव्या पातळीला जाऊन पोहोचल्या आहेत. कायद्याचा सन्मान करुन मुलींना संरक्षण देण्याऐवजी भाजप सरकार गुन्हेगारांना आश्रय देत आहे. पीडित कुटुंबीयांचा आवाज दाबला जात आहे. हा नवीन राजधर्म आहे का? असा सवाल सोनिया गांधींनी केला आहे. 

आपली लोकशाही सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आपल्या संविधानावर पद्धतशीर हल्ला केला जात आहे. आपला देश सध्या अशा सरकारच्या हाती आहे, जे काही भांडवदारांचे हित पाहात आहे, अशी टीकाही सोनिया गांधी यांनी केली आहे.

देशातील अमेरिकी नागरिकांना डांबून ठेवू; चीनचा इशारा
 

दरम्यान, हाथरस पीडितेवरील सामूहित बलात्कार आणि अत्याचारप्रकरणी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवाय त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची हाथरस येथे जाऊन भेट घेतली होती. योगी सरकारने पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, तसेच आरोपींना पाठिशी घालू नये, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president soniya gandhi criticize narendra modi bjp