काँग्रेस सर्व जागी स्वबळावर : प्रियांका गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियांका गांधी

काँग्रेस सर्व जागी स्वबळावर : प्रियांका गांधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या बहुचर्चित निवडणूकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुलंदशहरमध्ये ही घोषणा केली. केवळ कार्यकर्त्यांना संधी देऊ, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसला जिंकायचे असेल तर ते स्वतःच्या ताकदीवर, अशा शब्दांत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, सत्ताधारी भाजपला ३० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी वर्तविले. ते म्हणाले की, समाजवादी पक्ष आणि भाजप निकाल आधीच नक्की झालेली निवडणूक लढत आहेत. केवळ काँग्रेसच खऱ्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होताच भाजप नेत्यांना मतदारांकडे जाऊ देत, मग पाहा काय होते ते...महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था अशा प्रश्नांवर लोक जाब विचारतील.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

फक्त सात जागा...

काँग्रेसला २०१७च्या विधानसभा निवडणुकीत दारुण अपयश आले होते. त्यांनी समाजवादी पक्षासह युती केली होती. काँग्रेसच्या वाट्याला ११४ जागा आल्या होत्या. त्यात काँग्रेसला केवळ सात जागी विजय मिळविता आला होता.

कोणत्याही पक्षासह युती करू नका असे अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितले. आपण सर्व जागा लढवू आणि स्वबळावर लढू अशी खात्री मी तुम्हाला देते.

- प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या

loading image
go to top