गोंधळ घालायचा असेल तर घरी चालते व्हा : प्रियंका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

तुम्ही याठिकाणी कशासाठी आले आहात, याचे जरा भान बाळगा. आता प्रत्येकाने गप्प बसा. ज्यांना धक्काबुक्की करायची आहे, त्यांनी सरळ घरी चालते व्हा.

- प्रियांका गांधी, काँग्रेस

नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआतील बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून मध्यरात्री काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह असंख्य कार्यकर्तांनी उपस्थिती लावली. राहुल गांधीची बहीण प्रियांका गांधीदेखील या मोर्चाला उपस्थिती लावली. याचदरम्यान गर्दीतील लोकांच्या दंग्यामुळे प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी 'गोंधळ घालायचा असले तर सरळ घरी चालते व्हा', अशा शब्दांत दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावले.

Priyanka gandhi

कँडल मार्च इंडिया गेटजवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार घडला. या मोर्चादरम्यान मोठी गर्दी असल्याने या गर्दीवर पोलिसांना नियंत्रण ठेवता आले नाही. या मोर्चातील अनेकजण प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दीकडून सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली. त्यामुळे प्रियांका गांधींना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. या अशा अनपेक्षित प्रकारामुळे प्रियांका गांधी यांच्यासह त्यांची लहान मुलगी खूप भयभीत झाली आणि रडायला लागली. त्यानंतर प्रियांका गांधी प्रचंड संतापल्या. त्यांनी धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. 

प्रियंका म्हणाल्या, तुम्ही याठिकाणी कशासाठी आले आहात, याचे जरा भान बाळगा. आता प्रत्येकाने गप्प बसा. ज्यांना धक्काबुक्की करायची आहे, त्यांनी सरळ घरी चालते व्हा, असे प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, मोर्चा सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी पाहून राहुल गांधींचा मेणबत्ती मोर्चा यशस्वी झाला, असे वाटत होते. मात्र, या गोंधळामुळे मोर्चावर टीका केली जात आहे. 

Web Title: Congress Priyanka Gandhi gets angry at the candlelight march today midnight