बेरोजगार युवकांना अडीच हजार देणार- काँग्रेस

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

काँग्रेस पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला शिरोमणी अकाली दल, भाजप व आम आदमी पक्षाकडून कडवी लढत मिळणार आहे. सहा महिने जाहीरनाम्यावर काम करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

चंदीगड - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करत राज्यातील बेरोजगार युवकांना दर महिन्याला अडीच हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले.

काँग्रेसने आज (सोमवार) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली असून, युवकांना मासिक भत्त्यासह प्रत्येक घरातील एकाला नोकरी, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि चार टप्प्यात नशामुक्ती यांचा समावेश आहे. मनमोहनसिंग यांनी सत्ताधारी शिरोमणी अकाली दलावर जोरदार टीका केली आहे. शिरोमणीच्या धोरणामुळे पंजाबचा विध्वंस झाला, असे त्यांनी म्हटले आहे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाबंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रचार करणार आहे.

काँग्रेस पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला शिरोमणी अकाली दल, भाजप व आम आदमी पक्षाकडून कडवी लढत मिळणार आहे. सहा महिने जाहीरनाम्यावर काम करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मुलींना पीएचडीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. पाच रुपये प्रती युनिट वीज देण्यात येईल. उद्योगांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

Web Title: Congress promises stipend of Rs 2500 for unemployed youth in Punjab in its manifesto.