काँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी : राहुल गांधी

Congress promises to waive farmers loan within 10 days of coming to the power in Chhatisgarh
Congress promises to waive farmers loan within 10 days of coming to the power in Chhatisgarh

कांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी या कंपन्या गायब झाल्या. या चिटफंड गैरव्यवहारात मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नाव आले होते. त्यामुळे रमणसिंह यांचे हे भ्रष्ट सरकार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करेन, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी रमणसिंह सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते. राहुल गांधी यांच्या सभेतील ठळक मुद्दे : 

- आज पंजाब आणि हरियाना शेतीमुळे ओळखला जात आहे. 

- छत्तीसगड आणि मध्यप्रदेशही येत्या 5 वर्षांमध्ये शेतीसाठी मोठं असे ठरणार आहे, असे मला वाटते.

- संपूर्ण देशातील लोकांना समजायला हवे, की त्यांना जे अन्नधान्य मिळते ते छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून मिळते.

- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया कंपनी स्थापन व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

- तुम्हाला तुमच्या निर्मितीला योग्य दर मिळेल. फक्त यासाठी नाही तर तुमची मुलांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळेल. 

- छत्तीसगडची जनता गरीब आहे. 

- तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाही. तुमचा पैसा काढून श्रीमंतांना दिला जातो. 

- मोदीजी, जिथे कुठे जातात तिथे सांगतात मी भ्रष्टाचारविरोधी लढतो. मात्र, ते सांगत नाही की छत्तीसगडचे मुख्यमंत्री भ्रष्ट आहेत. 

- राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला.


- अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. काही वर्षांनी या कंपन्या गायब झाल्या. 

- या चिटफंड गैरव्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नाव.

- पनामा पेपर्सप्रकरणात पाकिस्तानच्या पंतप्रधानचे नाव आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागते.

- छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामामध्ये येते तर त्यांच्यावर कारवाई का नाही ?

- रमणसिंह यांच्या सरकारला अनेक वर्षे झाले. मात्र, अद्याप 40 लाख तरुण बेरोजगार आहेत. 

- मोदीजी, रमणसिंह सांगतात रोजगार देऊ. मात्र, त्यांनी रोजगार दिले नाहीत.

- तसेच 2 कोटी रोजगार देऊ असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते, असे काही झाले नाही.

- आमचा पक्ष सत्तेवर आल्यास बेरोजगारांना रोजगार देऊ, प्रत्येक कुटुंबाला जमीन देऊ.

- मोदींनी अनिल अंबानीला 30 हजार कोटी रुपये दिले.

- राज्यातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे कर्जमाफसाठी जातात. मात्र, त्यांचे कर्जमाफ करणार नाही, असे त्यांना सांगितले जाते. 

- मोदीजींनी रोजगार, शेतकऱयांची कर्जमाफी अशी आश्वासने दिली होती. मात्र, यातील आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत.

- पंजाबमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी देण्यात आली. 

- रणमसिंह मोठ्या उद्योगपतींना मदत करतात. 

- काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करेन.

- तांदळाला 2500 रुपये भाव देऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com