Loksabha 2019 : 'भारतीय जुमला पार्टी’; काँग्रेसकडून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र यामध्ये भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत दिलेली आश्वासने कशी पुर्ण झाली नाहीत हे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा जोर वाढत असताना, सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या कल्पना लढवून प्रचार केला जात आहे. आता काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करत त्याला भारतीय जुमला पार्टी असे नाव दिले आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र यामध्ये भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत दिलेली आश्वासने कशी पुर्ण झाली नाहीत हे सांगण्यात आले आहे.

तसेच भारतीय जुमला पार्टी आणि अच्छे दिन आयेंगे, कभी ना कभी अशा शिर्षंकांखाली हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला असून, यामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या जाहीरनाम्यातून एकप्रकारे भाजप 2019 मध्ये सत्तेत आल्यावर काय करणार हे सांगण्यात आले आहे. 

काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, भाजपचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात काय आश्वासने असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काँग्रेसने भाजपवर जाहीरनाम्याच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.

Web Title: Congress releases BJP Manifesto on twitter handle