कॉंग्रेसची दलित, मुस्लिम, ओबीसींसाठी आश्‍वासने

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

या जाहीरनाम्यामध्ये पक्षाकडून तरुण वर्ग, शेतकरी आणि दलितांसाठी विविध आश्‍वासने देण्यात आली आहेत

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून आज (बुधवार) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व लहान मुलांच्या विकासावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये येत्या 11 फेब्रुवारीपासून मतदानास प्रारंभ होणार आहे.

कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश शाखा अध्यक्ष राज बब्बर यांनी इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी गुलाम नबी आझाद, अशिक गेहलोत, सलमान खुर्शीद आणि शीला दीक्षित हे कॉंग्रेस नेतेदेखील उपस्थित होते. या जाहीरनाम्यामध्ये पक्षाकडून तरुण वर्ग, शेतकरी आणि दलितांसाठी विविध आश्‍वासने देण्यात आली आहेत.

या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेल्या घोषणा -

  • 9 वी ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल
  • दलित तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान
  • अल्पसंख्यांकांसाठी कमी व्याज दरात 2 लाख रुपयांचे कर्ज
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी
  • ओबीसी वर्गास आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आरक्षणाची सुविधा
Web Title: Congress releases manifesto for Uttar Pradesh