काँग्रेसने केले शिस्तपालन समितीत फेरबदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसने केले शिस्तपालन समितीत फेरबदल

sakal_logo
By
राहुल शेळके

नवी दिल्ली : घरातील बंडखोर आणि शिस्तीशी संबंधित समस्या हाताळण्यात व्यस्त असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकांपूर्वी गुरुवारी आपल्या शिस्तपालन समितीचे पुनरुज्जीवन केले.पक्षाचे दिग्गज नेते एके अँटनी हे पॅनेलचे प्रमुख आहेत तर अंबिका सोनी, तारिक अन्वर, जेपी अग्रवाल आणि जी परमेश्वर हे त्याचे इतर सदस्य आहेत.

अंबिका सोनी या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत, तर तारिक अन्वर हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते त्यांना आता अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: नासाने सॅटेलाइटद्वारे दिल्लीतील चित्र काढून सांगितले प्रदूषणा मागील कारण

दिल्लीचे माजी पीसीसी प्रमुख जेपी अग्रवाल यांना या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना शिस्तीशी संबंधित सर्व मुद्दे हाताळणे आणि काँग्रेस अध्यक्षांना कारवाईची शिफारस करणे हि कामे दिली आहेत. पक्षाकडे असे राज्यस्तरीय पॅनेल असताना, हे केंद्रीय शिस्तपालन पॅनेल असल्याने AICC (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) स्तरावरील प्रकरणे हाताळते.

loading image
go to top