Bharat Jodo: ज्योतिरादित्य सिंधियांची घरवापसी? 'भारत जोडो'बाबतचे 'ते' विधान चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jyotiraditya scindias  and Rahul Gandhi

Bharat Jodo: ज्योतिरादित्य सिंधियांची घरवापसी? 'भारत जोडो'बाबतचे 'ते' विधान चर्चेत

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो यात्रे'बाबत केलेल्या विधानाने काँग्रेसमध्ये घरवापसीचे वारे सुरू होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्याने देखील याबाबत केल्याने विधानाने केंद्रीयमंत्री आणि पुर्वाश्रमीचे काँग्रेसनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. (jyotiraditya scindias news in Marathi)

सिंधिया यांनी भारत जोडोचे मध्य प्रदेशात 'स्वागत'च असं विधान केलं होतं. त्यांचे हे विधान त्यांच्या 'घरवापसी'चे लक्षण असू शकते, असं काँग्रेसच्या प्रवक्त्याने गुरुवारी म्हटलं. शिवाय भाजपमध्ये सिंधिया नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा: Bharat Jodo: गेहलोत-सचिन पायलट मतभेदावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान; म्हणाले...

सिंधिया म्हणाले होते की, "मध्य प्रदेशात प्रत्येकाचं स्वागत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (काँग्रेस) माजी सदस्य सिंधिया यांनी मार्च २०२० मध्ये पक्ष सोडल्यानंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एचपीसीसी) माजी अध्यक्ष आणि काँग्रेस प्रवक्ते कुलदीपसिंग राठोड म्हणाले, सिंधिया यांचं हे विधान त्यांच्या घरवापसीचे लक्षण असू शकते.

नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान हे परिवर्तनाचे लक्षण असून लोक भाजपप्रणित राज्य सरकारवर नाराज असल्याचे राठोड यांनी सांगितले. राठोड म्हणाले की, गेल्या वर्षी तीन विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासूनच भाजपच्या पराभवाला सुरुवात झाली आहे. हिमचालमध्ये काँग्रेसचेच सरकार येईल, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: काळ्या टोपीच्या सडक्या मेंदूमागे कोण? याचा शोध घ्यावा लागेल; ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री कोण होणार, असे विचारले असता राठोड म्हणाले की, राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षाचे आमदार आणि पक्ष हायकमांड ठरवतील.

टॅग्स :BjpRahul GandhiCongress