शहा, इराणी यांच्या जागांवर काँग्रेसला दगाफटक्याची भीती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जून 2019

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काही राज्यसभा खासदार आता लोकसभेत जातील त्यामुळे राज्यसभा खासदारांच्या रिक्त जागांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. यावर काँग्रेसने तयारी सुरू केली असून यात काँग्रेसला दगाफटका होण्याच्या भीतीने गुजरातमध्ये दोन राज्यसभा सदस्यांसाठीची निवडणूक एकाचवेळी घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काही राज्यसभा खासदार आता लोकसभेत जातील त्यामुळे राज्यसभा खासदारांच्या रिक्त जागांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. यावर काँग्रेसने तयारी सुरू केली असून यात काँग्रेसला दगाफटका होण्याच्या भीतीने गुजरातमध्ये दोन राज्यसभा सदस्यांसाठीची निवडणूक एकाचवेळी घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना 28 मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना 29 मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रिय मंत्री स्मृती इराणी या लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. काँग्रेसने दावा केला आहे की, निवडणूक आयोग दोन्ही जागांवर वेगवेगळी निवडणूक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने या दोन्ही जागांवरील निवडणूक वेगवेगळी घेणे संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अमित शाह आणि स्मृती इराणी यांच्या जागांवर सोबत निवडणूक घेण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही जागांवार एकत्र निवडणुक झाल्यास एक जागा विरोधी पक्षाला तर एक जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत पण, वेगवेगळी निवडणुक झाल्यास दगाफटका होऊ शकतो असे काँग्रेसचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress seeks simultaneous polls to Rajya Sabha seats vacated by Amit Shah, Smriti Irani