ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्ष व काँग्रेसने हातमिळवणी केल्यानंतर राज्यात 'शोले' स्टाईलचे पोस्टर्स ठिकठिकाणी लागले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 'जय-विरू';च्या माध्यमातून पोस्टर्सवर दिसत आहेत.

सन 1970च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या शोले चित्रपटात जय-विरूची मैत्री झळकली होती. यामैत्री प्रमाणेच अखिलेश यादव व राहुल गांधी जय-विरूच्या जोडीप्रमाणे झळकताना दिसत आहेत. पोस्टर्सवर ये दोस्ती हम नही तोडेंगे... तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे... या ओळी आहेत.

राहुल गांधी हे विरूच्या तर अखिलेश यादव जयच्या भूमिकेत असून, दुचाकीवरील त्यांचे छायाचित्र राज्यभर दिसत आहे. शिवाय, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही ते फिरत आहे. ये दोस्ती हम नही तोडेंगे... या गाण्याप्रमाणे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. शिवाय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, हसीब अहमद व अखिलेश यादव यांची पत्नी डिंम्पल यादव यांचेही छायाचित्र आहे.

दरम्यान, राज्यातील जनता या 'शोले' स्टाईलच्या 'दोस्ती'ला पसंद करते की नाही हे काही दिवसांतच पहायला मिळेल.

Web Title: Congress' Sholay Poster Predictably Has Rahul Gandhi As Jai