
पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत खुद्द पाकिस्ताननेच कबुलीजबाब दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी, कॉंग्रेस पक्ष व तत्सम इतर विरोधी नेत्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत खुद्द पाकिस्ताननेच कबुलीजबाब दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी, कॉंग्रेस पक्ष व तत्सम इतर विरोधी नेत्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आता पाकिस्तानने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्यांचा हात असल्याचे जाहीरपणे कबूल केल्यानंतर कॉंग्रेस व इतरांनी त्यांच्या त्यावेळच्या विधानांबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
केंद्राकडून लशीच्या वितरणाची तयारी; आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सूचना
मागील वर्षीच्या सुरवातीला काश्मीरमधील पुलवामा येथे निमलष्करी दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याची थेट जबाबदारी घेणारे विधान पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी नुकतेच केले. त्यानंतर त्यांनी कोलांटउडी मारली तरी त्यांच्या मूळ विधानांवरून भाजपने राहुल गांधी व अन्य कॉंग्रेस नेत्यांना लक्ष केले आहे.
धक्कादायक! अमेठीत दलित गाव प्रधानाच्या पतीला जाळले जिवंत
विरोधकांची अशीही टीका
पुलवामा हल्ला हा सुरक्षा प्रणालीतील दोषांचा परिणाम आहे व या हल्ल्याचा सर्वांत जास्त (राजकीय) लाभ कोणाला मिळाला ? असा उपरोधिक सवाल राहुल गांधी यांनी त्यावेळी केला होता. पुलवामा हा हल्ला म्हणजे नरेंद्र मोदी व पाकिस्तानी जनतेतील मॅच फिक्सिंग असल्याचे वादग्रस्त विधान बी. के. हरीप्रसाद यांनी गतवर्षी मार्चमध्ये केले होते. कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्या विधानावरूनही वादंग निर्माण झाला होता.
Edited By - Prashant Patil