काँग्रेसने जेडीएस सोबत युती करावीः ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्लीः कनार्टक विधानसभा निवडणूकीमधील निकाल पहाता काँग्रेसने जेडीएस सोबत युती करायला हवी, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर विजयी झालेल्यांना शुभेच्छा अशा शब्दात बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, पराभव झालेल्यांना पुन्हा लढण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसने जर जेडीएस सोबत युती केली असती तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते, असे ट्विट बॅनर्जी यांनी केले आहे.

Web Title: congress should have allied with jds say mamata banerjee