काँग्रेसचा भाजपला 5-0 ने धोबीपछाड; भाजपचा धुव्वा

Rahul_Gandhi
Rahul_Gandhi

नवी दिल्ली : लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या तासाभरात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या लढाईत प्रथमच राहुल यांची सरशी होताना दिसत आहे. 

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीर्घ कालावधीपासून भाजपची सत्ता आहे. ही राज्ये यंदा काँग्रेसने खेचून घेतली आहेत, असे मतमोजणीच्या सुरवातीच्या पहिल्या तासातील चित्र आहे. 

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे अधिकृतरित्या हाती घेतली होती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच काँग्रेसने पाच राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांतील साडेआठ हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या मतमोजणीनंतर निश्‍चित होणार आहे. सर्वांत जास्त म्हणजे 2,907 उमेदवार मध्य प्रदेशात होते. येथेच सर्वाधिक 65,367 यंत्रांचा वापर केला गेला. ही सर्व मतदान यंत्रे पाचही राज्यांमधील स्ट्रॉमरूममध्ये मोठ्या सुरक्षेखाली ठेवण्यात आली आहेत.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत.

राजस्थानमध्ये शुक्रवारी 72.37 टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. 

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल काँग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत आहे. या निवडणुकांवर तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे. 

सकाळी नऊ वाजेपर्यंतची पाचही राज्यांमधील स्थिती पुढीलप्रमाणे : 
मध्य प्रदेश : 

काँग्रेस : 51 
भाजप : 47 

राजस्थान : 
काँग्रेस : 65 
भाजप : 43 

तेलंगणा : 
काँग्रेस : 30 
टीआरएस : 30 
भाजप : 3 

मिझोरम : 
काँग्रेस : 2 
इतर : 1 

छत्तीसगड : 
काँग्रेस : 30 
भाजप : 24

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com