केजरीवाल पंजाबसाठी धोकादायक - राहुल

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ज्या शक्तींनी यापूर्वी पंजाबला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्यामुळे हिंसा झाली होती. आता त्याच शक्तींना पुन्हा उभारण्यासाठी केजरीवाल मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

चंदिगड - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये देशविरोधी शक्तींना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करत आहेत. ते पंजाबसाठी धोकादायक आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) संगरूर येथे नागरिकांशी संवाद साधला. राहुल यांनी मोदी सरकारवर टीका करत केजरीवाल यांनाही लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, की ज्या शक्तींनी यापूर्वी पंजाबला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्यामुळे हिंसा झाली होती. आता त्याच शक्तींना पुन्हा उभारण्यासाठी केजरीवाल मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे सरकार आल्यास अमली पदार्थांपासून पंजाबची पूर्णपणे मुक्ती केली जाईल. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून, पंजाबला विकासाच्या दिशा दाखवू. मोदी सरकार फक्त स्वतःसाठी काम करत असून, त्यांना स्वतःचीच चिंता आहे. 

Web Title: congress vice president rahul gandhi attacks kejriwal in sangroor