मोदी आमच्यावर आरोप करतायत; काँग्रेस खासदारांचे वॉक आऊट

मोदी आमच्यावर आरोप करतायत; काँग्रेस खासदारांचे वॉक आऊट
Summary

कोरोना पसरवण्याला काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा संसदेतही त्यांनी काँग्रेसला सुनावलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. कोरोना (Corona) पसरवण्याला काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा संसदेतही त्यांनी काँग्रेसला सुनावलं. मोदींच्या या भाषणावेळी काँग्रेस (Congress) खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान काय बोलतायत असं ते म्हणाले. यावर मोदींनी तुम्ही सन्माननीय नेते आहात, तुम्हाला हे बोलणं शोभत नाही असं म्हणत खर्गेंना गप्प बसवलं. कोरोना काळात सरकारने घेतलेल्या बैठकांवर काँग्रेसकडून बहिष्कार घातला गेला, मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) साथ दिली असं म्हणत मोदींनी पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला.

दरम्यान, काँग्रेसच्या खासदारांनी मोदींचे भाषण अर्धवट सोडून राज्यसभेतून बाहेर पडण्याचा मार्ग धरला. यानंतर संसदेबाहेर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की,'अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्याचं सोडून मोदी काँग्रेसवर टीका करत असल्यानं आम्ही बाहेर आलो.' दुसरीकडे मोदींनी राज्यसभेत बोलताना म्हटलं की, 'देशात काँग्रेस पक्ष नसता तर आज सामान्य माणसांना रस्ता, वीज यासाठी इतका काळ वाट बघावी लागली नसती.'

मोदी आमच्यावर आरोप करतायत; काँग्रेस खासदारांचे वॉक आऊट
शरदरावांकडून शिका, PM मोदींकडून संसदेत पवारांची स्तुती

मोदी म्हणाले की, देशात काँग्रेस नसेल तर काय होईल, हे सर्वांना माहिती होतं. महात्मा गांधींनासुद्धा माहिती होतं. त्यामुळे त्यांना काँग्रेस नको होती. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार जर आज काँग्रेस पक्ष नसता तर काय झाले असते? लोकशाही घराणेशाहीतून मुक्त झाली असती. भारत परदेशाऐवजी स्वदेशी संकल्पावर चालला असता. काँग्रेस नसता तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसता तर जातीयवाद आणि भ्रष्टाचार नसता. काँग्रेस जर नसते शिखांचं नरसंहार झाला नसता. वर्षानुवर्ष पंजाब दहशवादामध्ये धगधगत नसता असंही मोदींनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com