पर्यटन धोरणावर विचारासाठी कॉग्रेसला हवा वेळ

अवित बगळे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पणजी : गोव्याच्या  पर्यटन धोरणावर विचार करण्यासाठीच्या बैठकीला चारच आमदार उपस्थित राहिले असले तरी आता विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांनी तसे पत्र पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांना पाठवले आहे.
उपसभापती मायकल लोबो यांनी या धोरणासाठी दोन कोटी रुपये खर्च कऱण्यावर तीव्र नापसंती व्यक्त करत पर्यटन क्षेत्रासमोरील छोटे छोटे प्रश्न आधी सोडवा असे काल (ता. 16) सांगितले होते.

आमदार अलिना साल्ढाना यांनी राज्यात पर्यटनाचा बृहद आराखडा अस्तित्वात आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. कोणी केव्हाच त्याला उल्लेखही कसा केला नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. एकंदरीत या साऱ्याला सर्वांचा विरोध असल्याचे चित्र तयार झाले होते त्यातच आता विरोधी पक्षनेत्यानी वेळ मागितल्याने पर्यटन धोरण पुढे रेटणे कठीण होणार असे दिसते.

कवळेकर यांनी पाठवलेल्या पत्रात कॉंग्रेसच्या आमदारांना या धोरणाचा अभ्यास करून आक्षेप, सुचना, शिफारशी नोंदवण्यासाठी 10 दिवस हवेत असे नमूद केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे इतर आमदारही या पर्यटन धोरणाची चिरफाड करतील हे ठरून गेलेले आहे. कालच्या सादरीकरणानंतर पर्यटन धोरण लागू करता येईल अशी भूमिका पर्यटनमंत्री आजगावकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना घेतली होती. काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करू असेही ते म्हणाले होते. मात्र कॉंग्रेसचा एकंदरीत सूर पाहता ते पर्यटन धोरण आहे तसे लागू करण्यास देतील असे नाही. पर्यटन बृहद आराखड्याची रखडलेली अंमलबजावणी यावरही ते सरकारला घेरण्याची चिन्हे आहेत. या धोरणाचा दस्तावेज आकाराने फारमोठा असल्याने आणि पर्यटन हे राज्यासाठी महत्वाचे क्षेत्र असल्याने त्याचा तपशीलाने अभ्यास होणे आवश्यक असल्याकडेही पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे. कालच हे पत्र पाठवण्यात आले आहे.

Web Title: congress wants time to plan tourism