कर्नाटकात भाजपला झटका; जयानगरमध्ये काँग्रेसचा विजय

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजपचे जोरदार प्रचार केला होता. अखेर काँग्रेसच्या उमेदवार रेड्डी यांनी 54457 मते मिळविली. तर, भाजपच्या प्रल्हाद यांना 51568 मते मिळाली. 

बंगळूर : कर्नाटकमधील दक्षिण बंगळूरमधील जयानगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला.

काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला. याठिकाणी 11 जूनला 55 टक्के मतदान घेण्यात आले होते. 12 मे रोजी कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणाहून निवडून आलेले भाजपचे उमेदवार बी. एन. विजय कुमार यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आता या विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजपचे जोरदार प्रचार केला होता. अखेर काँग्रेसच्या उमेदवार रेड्डी यांनी 54457 मते मिळविली. तर, भाजपच्या प्रल्हाद यांना 51568 मते मिळाली. 

Web Title: Congress wins in Karnataka Jayanagar byelection