महाराष्ट्रातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटले : मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

गोंदा (उत्तर प्रदेश) - महाराष्ट्रातील महानगरपालिकेत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटल्याची टीका केली आहे.

गोंदा (उत्तर प्रदेश) - महाराष्ट्रातील महानगरपालिकेत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटल्याची टीका केली आहे.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे निकाल भारतीय जनता पक्षाचा उत्साह वाढविणारे आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटले आहे. आपल्या देशातील जनतेला शंकरासारखा "तिसरा डोळा' आहे. जनतेला चांगले आणि वाईट ओळखता येते. दिल्लीत वातानुकूलित दालनात बसणाऱ्या राजकारण्यांना उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या राजकीय वादळाचे आकलन झालेले नाही.' उत्तर प्रदेशमधील शिक्षणपद्धती अत्यंत भ्रष्ट आणि दुर्बल असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली. "तुम्ही उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता. मात्र, येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?', असा प्रश्‍न मोदी यांनी यावेळी उपस्थित केली. "जर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तर आम्ही येथील जनतेला सुरक्षितता  देण्याची खात्री देतो', असे आश्‍वासन मोदी यांनी यावेळी दिले.

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान होत आहे. 11 मार्च रोजी तेथील निकाल जाहीर होणार आहेत.

Web Title: Congress wiped out from Maharashtra : Modi