राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा नसतील : चिदंबरम

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मी कधीच म्हटलेले नाही की राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. काही काँग्रेस नेत्यांना असे वाटत असले तरी काँग्रेस समितीने यात हस्तक्षेप करून चर्चा थांबविली आहे. आम्हाला फक्त भाजपमधून सत्तेतून हटवायचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारे, महिला व मुलांचे संरक्षण करणारे, प्रत्येक नागरिकाचे हक्क अबाधिक राखणारे आणि प्रगतीशील सरकार आम्हाला आणायचे आहे.

चेन्नई : काँग्रेसकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा अन्य कोणत्याही चेहऱ्याला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले आहे.

सत्ताधारी भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी आघाडीबाबत बोलणी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेसने कोणत्याच नेत्याला पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास नकार दर्शविला आहे. प्रादेशिक पक्षांकडून पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होत असल्याने राहुल गांधी यांना चेहरा म्हणून पुढे करण्यास काँग्रेसमधून नकार येत आहे.

एका तमिळ वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम म्हणाले, की मी कधीच म्हटलेले नाही की राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. काही काँग्रेस नेत्यांना असे वाटत असले तरी काँग्रेस समितीने यात हस्तक्षेप करून चर्चा थांबविली आहे. आम्हाला फक्त भाजपमधून सत्तेतून हटवायचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारे, महिला व मुलांचे संरक्षण करणारे, प्रत्येक नागरिकाचे हक्क अबाधिक राखणारे आणि प्रगतीशील सरकार आम्हाला आणायचे आहे. त्यामुळे आम्ही प्रादेशिक पक्षांशी युती करणार आहोत. पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा करू.

Web Title: Congress Won’t Project Rahul Gandhi as PM Face in 2019, Says Chidambaram