congress workers fight in front of mp in dehradun
congress workers fight in front of mp in dehradun

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना चपलेने चोपले

डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री 'हरीष रावत मुर्दाबाद' म्हटल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना चांगलेच चोपून काढले.

हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती. यासाठी माजी खासदार आणि निरिक्षक महिंद्र पाल सिंह यांना पाठविण्यात आले होते. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या. एका-एकाला मुलाखतीसाठी बोलवले जात होते. खोलीच्या एका बाजूला रावत समर्थक तर दुसऱ्या बाजूला पालीवाल समर्थक उभे होते. ज्या गटाच्या नेत्याला बोलावले जायचे त्याचा गट जोरदार घोषणाबाजी करायचा. काही वेळानंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पालीवाल यांच्या समर्थकांमध्ये तिकिट कोणाला द्यायचे यावरून वाद सुरु झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सूरू केली. पालिवाल यांच्या एका कार्यकर्त्याने मध्येच 'हरीष रावत मुर्दाबाद' अशी घोषणा ठोकली आणि दोन्ही गट एकमेकांवर भिडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना चपलेने अक्षरशः चोपून काढले. अर्धातास सुरू असलेल्या गोंधळात कोण कोणाला मारत होते, हे समजतच नव्हते. अखेर, माजी महापौर यशपाल राणा, डॉ. संजय पालीवाल आणि माजी राज्यमंत्री मनोहरलाल शर्मा यांनी मध्यस्थी करत गोंधळ शांत केला.

बैठकीवेळी 10 जणांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. निरिक्षक महेंद्र पाल सिंह यांनी कोणालाही तिकिट मिळाले तरी गटतट बाजूला ठेवून काँग्रेसला जिंकण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय, बैठकीदरम्यान केवळ बाचाबाची झाली, असे काँग्रेसचे निरिक्षक सिंह यांनी सांगत हाणामारीचे वृत्त फेटाळले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'मेरा बुथ सबसे मजबूत' हा कानमंत्र दिला. पण उत्तरप्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफाडत 'मेरा बुट सबसे मजबूत'..! असा संदेश दिला. संत कबीर नगर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्यामध्ये काल तुंबळ हाणामारी झाली. चालू बैठकीत खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने मारहाण करण्यात सुरवात केल्याने सगळेच चक्रावले. यानंतर सिंह उठले आणि त्यांनीही त्रिपाठी यांना मारण्यास सुरवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com