
Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
Karnataka Politics: सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेत आलं आहे. यानंतर नवीन आमदारांनी शपथ घेतल्यानंतर १६ व्या कर्नाटक विधानसभेचं पहिलं सत्र सोमवारी सुरू झालं.
दरम्यान विधानसभा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसीय सत्रामध्ये २२४ निवडून आलेले आमदार शपथ घेतील. तसेच सभागृहाच्या नवीन अध्यक्षांची निवड देखील करण्यात येईल. (Latest Marathi News)
यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, मंत्री जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, एमबी पाटील, केजे जॉर्ज, सतीश जारकीहोली, प्रियांक खर्गे यांनी आमदार म्हणून शपथ घेतली आहे.
दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बंगळूरू यथे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांच्या पाया पडले. शिवकुमार यांनी चरणस्पर्श करुन त्यांनी कृ्ष्णा यांचे आशीर्वाद घेतले.
तसेच शिवकुमार यांनी विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं देखील टेकवलं. तसेच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मइ यांची भेट देखील घेतली. (Marathi Tajya Batmya)
मात्र याआधी बंगळीरू येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य विधानसभेच्या बाहेर गौमूत्र शिंपडून आणि पूजा केली. त्यांनी आम्ही विधानसभेचे शुद्धीकरण करत असल्याचं म्हटलं.