मोदी-शहांना इशारा; एनडीएमधून आणखी एक मित्र पक्ष बाहेर पडणार?

 मोदी-शहांना इशारा; एनडीएमधून आणखी एक मित्र पक्ष बाहेर पडणार?

नवी दिल्ली- मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असा इशारा पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे. भाजपला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

एनडीएतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असे संगमा यांनी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. जर केंद्र सरकारनं हे विधेयक राज्यसभेत आणलं तर आम्ही तत्काळ एनडीएतून बाहेर पडू, असेही संगमा म्हणाले आहेत. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपचे सरकार आहे. तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपचा पाठिंबा आहे.

संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचे अपिल केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असे आहे की, ज्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजांच्या मुस्लिम लोकांना सर्व अडचणी संपवून भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. आम्ही दुसऱ्या पक्षांबरोबर मिळून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करू, कारण या विधेयकामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यात मोठा बदल होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही संगमा म्हणाले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितला होता. परंतु पीएमओनं आम्हाला अजून वेळ दिलेली नाही, असेही संगमा यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com