'त्या' जवानाने तक्रार नव्हे, तर इच्छा व्यक्त केली : सीआरपीएफ

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणलेल्या समस्यांद्वारे त्याने कोणाकडेही तक्रार केली नसून त्याने केवळ त्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे स्पष्टीकरण सीआरपीएफने दिले आहे.

सीमा सुरक्षा दलाचे जवान जित सिंह यांनी एका व्हिडिओतून आपल्या समस्या समोर आणल्या आहेत. देशातील निवडणुका, नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, मंदिर, मशीद यासारख्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सीआरपीएफचे जवान करतात. परंतु, त्याप्रमाणात त्यांना सुविधा मिळत नाहीत, असा दावा जित सिंह यांनी केला आहे. त्यावर सीआरपीएफने जवानाने समोर आणलेल्या बाबींकडे तक्रार म्हणून नव्हे तर त्याची इच्छा म्हणून बघायला हवे, असे स्पष्टीकरण दिले आहे. जवानांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये वेतन, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, उपहारगृह, माजी सैनिकांना असलेल्या सुविधांबाबत माहिती दिली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने दररोज मिळत असलेल्या अन्नाचा पंचनामा करणारा एक जवानाने व्हिडिओच्या समोर आणल्यानंतर जित सिंह यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

Web Title: Constable Jeet Singh has no complaint, only voiced an aspiration : CRPF