नशेत दारु समजून प्यायले ॲसिड; तिघांचा मृत्यू

drink
drinksakal
Summary

दारु समजून ॲसिड प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अगरतळा : दारु समजून ॲसिड प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्रिपुरातील धलाई जिल्ह्यात ही घटना समोर आली असून बुधवारी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. धलाई जिल्ह्यातील मानु पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटली असून सचिंद्र रियांग (वय-२२), अधिराम रियांग (वय-३८) आणि भाबीराम रियांग अशी त्यांची नाव आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी रत्न साधन जमाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कंचनचर्रा परिसरात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी आलेल्या सर्वांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दारु प्यायली होती. यानंतर त्याच नशेत त्यातील तिघांनी रबर मॅट बनवण्यासाठी ठेवलेल्या ॲसिडचे दारु समजून सेवन केले.

drink
दलाई लामांना चीनपासून वाचवणारे आसाम रायफल्सचे नरेन दास यांचं निधन

घटनेनंतर तात्काळ तिघांनाही स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी बुधवारी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी या तिघांनाही मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com