गोवा - कसिनो महाराजाविरुद्ध अवमान याचिका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

गोवा : राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील पदपथावर कसिनो महाराजाचे बेकायदा कार्यालय उभारण्यात येऊनही पणजी महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदपथावरील अतिक्रमाणास बंदी घातली आहे. त्यामुळे  याविरुद्ध एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका सादर केली आहे व त्यावरील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. याचिकेत सरकार व पणजी महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे. 

या पदपथ अतिक्रमणाविरुद्ध काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने पणजी महापालिका तसेच बंदर कप्तान अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. पणजी महापालिकेने हे अतिक्रमण हटविण्याचे महिन्यापूर्वी आश्वासन दिले होते मात्र अजूनही कृती काहीच नाही. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यास पदपथ नसल्याने रस्त्याच्या बाजूने चालावे लागते. या रस्त्यावरून वेगाने वाहने धावत असल्याने पादचाऱ्यांना धोकादायक बनले आहे.

Web Title: Contempt petition against casino maharaja in goa