'एस ऑफ स्पेस'चा स्पर्धक दानिश झेहेनचा अपघाची मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

दानिशचे इन्स्टाग्राम पेजवर 10 लाखांइतके फॉलॉअर्स होते. त्याच्या मित्रांनी व सहकाऱ्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली व्यक्त केली आहे.  ​

मुंबई : प्रसिद्ध युट्युबर, लाईफ स्टाईल ब्लॉगर दानिश झेहेन (वय 21) याचा आज (ता. 20) सकाळी अपघाती मृत्यू झाला. मुंबईजवळील वाशी येथे दानिशच्या होंडा सीटीचा अपघात झाला. सध्या एमटीव्ही या वाहिनीवर सुरू असलेल्या 'एस ऑफ स्पेस' या विकास गुप्तांच्या रिअॅलिटी शोमध्ये दानिश स्पर्धक होता. दानिशचा सोशल मीडियावर विशेष चाहता वर्ग होता, त्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. 

दानिशच्या निधनाच्या माहितीनंतर विकास गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर दानिशचा फोटो शेअर करत भावनिक संदेश लिहिला आहे. 'दानिश तु कायम आमच्यात राहशील. आता मी इतर स्पर्ध्यांना कसे सांगू की तू पुन्हा शोमध्ये येणार नाहीस...' अशा अर्थाचा भवनिक संदेश विकासने दानिशसाठी लिहिला आहे. 

दानिशचे इन्स्टाग्राम पेजवर 10 लाखांइतके फॉलॉअर्स होते. त्याच्या मित्रांनी व सहकाऱ्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली व्यक्त केली आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Danish Zehen (1997- ∞) @danish_zehen

A post shared by Varun Sood (@varunsood12) on

 

 

Web Title: Contestant of Ace of Space Danish Zehen passed away in road accident