वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला भारतात आणणार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

नवी दिल्ली : धार्मिक अशांतता निर्माण करणे, मनी लॉन्डरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचा आरोप असणारा वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याला आज (बुधवार) रात्रीपर्यंत भारतात आणण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मलेशियातील पोलिसांनी नाईकच्या प्रत्यार्पणाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि ईडी अंतर्गत त्याची चौकशी सुरु आहे. ढाका येथे 2016 मध्ये झालेल्या हल्ल्याला शांती टीव्हीवरील त्याचे भाषण कारणीभूत असल्याचे बांगलादेशने म्हटले होते. या हल्ल्यात एका भारतीय मुलीसह 22 जणांचा मृत्यू झाला होता.

 2016 मध्ये नाईक यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला बेकायदा घोषित करण्यात आले आहे. तेव्हापासून तो भारताबाहेर आहे. 

या प्रकरणात 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त मनी लॉन्डरिंग केल्याच्या आरोपावरुन त्याची सध्या चौकशी सध्या सुरु आहे. नाईक याला आज रात्रीपर्यंत क्वालंलपूर येथून आणण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, झाकीर नाईक याने प्रत्यार्पणाचे वृत्त फेटाळले आहे.

Web Title: The controversial Muslim preacher Zakir Naik will be brought to India