झाकीर नाईकला भारतात आणण्याच्या हालचाली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला मलेशियात अटक करण्यात आली असून, त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या वृत्ताचे खंडन केले आहे. 

क्वालालंपूर/नवी दिल्ली: इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला मलेशियात अटक करण्यात आली असून, त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या वृत्ताचे खंडन केले आहे. 

"एनआयए'चे प्रवक्ता अलोक मित्तल यांनी, याविषयी आमच्याकडे अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे नमूद केले आहे. चिथावणीखोर भाषणे, आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणांत झाकीर आरोपी आहे. "एनआयए'ने त्याच्याविरोधात 2017 मध्ये गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामुळे तो मलेशियात पळून गेला होता. दरम्यान, त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी पूर्ण झाली असून, त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते.  

अटकेचे वृत्त निराधार : झाकीर 
झाकीर नाईकने अटक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मुंबईतून जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात झाकीरने म्हटले आहे, की माझ्या अटकेचे वृत्त निराधार आहे. मला सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत भारतात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. निष्पक्ष सरकार आल्यावरच मी मायदेशात परतेन. 

Web Title: The Controversial Muslim Preacher Zakir Naik Will Be Brought To India