देशात राष्ट्रभाषेवरून गदारोळ; जाणून घ्या, किती लोक बोलतात हिंदी

2011 च्या भाषिक जनगणनेत 121 मातृभाषा असून त्यातील 22 भाषांचा संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Hindi Language
Hindi LanguageSakal

नवी दिल्ली : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी राष्ट्रभाषा असल्याच्या गोष्टींवरून अनेकदा वाद निर्माण झाले असून, नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांना इंग्रजीऐवजी हिंदीतून संवाद साधण्याचे आवाहन केल्यावर या वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. मात्र, स्थानिक भाषांना हिंदीचा पर्याय होता कामा नये, असेही ते म्हणाले. हे काय कमी होते तर, बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे तसेच आपली मातृभाषा असल्याचे म्हणत ती तशीच राहणार असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रभाषेच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये आज आपण देशातील किती लोक हिंदी भाषेत बोलतात याचे गणित समजावून घेणार आहोत. (Controversy On National Language Hindi)

Hindi Language
Video : दिल्लीत NCB मोठी कारवाई; 350 कोटींचे हेरॉईन जप्त

भारतात किती लोक हिंदी बोलतात?

2011 च्या भाषिक जनगणनेत 121 मातृभाषा आहेत. या 121 भाषांपैकी 22 भाषांचा संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या 22 भाषांपैकी हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 528 कोटी लोक त्यांची मातृभाषा म्हणून हिंदी बोलतात, जी लोकसंख्येच्या 43.63 टक्के होती. याचा अर्थ 56.4 टक्के लोकांची मातृभाषा हिंदी नव्हती. मात्र, असे असतानाही देशातील 57 टक्के लोकांना हिंदी भाषा समजते.

संविधानात समाविष्ट असलेल्या प्रमुख भाषा

हिंदी (8.03%), मराठी (6.86%), तेलगू (6.7%), तमिळ (5.7%), गुजराती (4.58%), उर्दू (4.19%), कन्नड (3.61%), ओडिया (3.1%), मल्याळम (2.88%), पंजाबी (2.74%), आसामी (1.26%) आणि मैथिली (1.12%) या संविधानात समाविष्ट केलेल्या प्रमुख भाषा आहेत.

Hindi Language
अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरुन वाद.. म्हणाले, हिंदी..

हिंदी ही पहिल्यापासूनच अनेकांची मातृभाषा आहे का?

अनेक दशकांपासून हिंदी ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. 1971 च्या जनगणनेत, 37 टक्के लोक त्यांची मातृभाषा म्हणून हिंदी बोलत होते, जी 1981 मध्ये 38.7 टक्के, 1991 मध्ये 39.2 टक्के, 2001 मध्ये 41 टक्के आणि 2011 मध्ये 43.6 टक्के झाली. हिंदीचा वाटा वाढला, तर बंगाली, मल्याळम आणि उर्दू या भाषा कमी झाल्या. परंतु जर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने बघितले तर, 1971 मध्ये 202 दशलक्ष लोक त्यांची मातृभाषा म्हणून हिंदी बोलत होते, जे 2011 मध्ये 2.6 पटीने वाढून 528 दशलक्ष झाले. यासोबतच पंजाबी, मैथिली, बंगाली, गुजराती आणि कन्नड या भाषा मातृभाषा म्हणून बोलणाऱ्या लोकांची संख्याही दुपटीने वाढली.

2011 च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी ठिकाणी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. तर, कुमाऊनी, गढवाली, छत्तीसगढ़ी, राजस्थानी, भोजपुरी, मगही इत्यादी भाषा बोलणारे लाखो लोक आहेत. परंतु या भाषांना हिंदीची बोली किंवा बोली म्हणत हिंदीला जोडले जाते, असे असे भाषातज्ञांचे मत आहे.

Hindi Language
हिंदी राष्ट्रभाषेवरून देशाची दुसरी फाळणी नको - दामोदर मावजो

घटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये भोजपुरी आणि राजस्थानी भाषांचा समावेश करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने भोजपुरी आणि राजस्थानी भाषा जबरदस्तीने हिंदीत विलीन केल्याचा युक्तिवाद केला जात आहे. तर, 2011 च्या जनगणनेच्या अहवालात असे दिसून आले आहे की, 26.6 टक्के लोकांनी म्हणजेच सुमारे 322 दशलक्ष लोकांनी हिंदी ही त्यांची मातृभाषा म्हणून सांगितली होती आणि उर्वरित लोकांनी त्यांची मातृभाषा भोजपुरी, राजस्थानी, छत्तीसगढ़ी, मगही इत्यादी असल्याचे सांगितले होते, ज्या हिंदीमध्ये जोडल्या गेल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com