दिल्लीत पोलिस-वकिलांमध्ये वाद; पोलिसांकडून गोळीबार

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

दिल्ली पोलिस व वकिलांमध्ये झालेला हा वाद पार्किंगच्या मुद्यावरून झाला. यानंतर या वादाला हिंसक वळण प्राप्त झाले. यामध्ये काही माध्यम प्रतिनिधींनाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलिस व वकिलांमध्ये वाद उफाळला. या वादाला हिंसक वळण मिळाले असून, पोलिसांकडून गोळीबारही करण्यात आला. यामध्ये एक वकील गंभीर जखमी झाला आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर वकील भडकले. त्यानंतर संतप्त झालेल्या वकिलांनी पोलिसांचे वाहन पेटवून दिले. पोलिसांच्या गोळीबारामुळे एक वकील गंभीर जखमी झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाणही केल्याची माहिती मिळत आहे. 

याशिवाय न्यायालय परिसरातील अनेक वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली.

पार्किंगवरून वाद

दिल्ली पोलिस व वकिलांमध्ये झालेला हा वाद पार्किंगच्या मुद्यावरून झाला. यानंतर या वादाला हिंसक वळण प्राप्त झाले. यामध्ये काही माध्यम प्रतिनिधींनाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cops Lawyers Clash At Delhis Tis Hazari Court