esakal | Corona Updates: रुग्णांचा आकडा 84 लाखांच्या पार; दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

देशातील कोरोना परिस्थिती पाहिली तर काही ठराविक राज्यांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.

Corona Updates: रुग्णांचा आकडा 84 लाखांच्या पार; दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची भीती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाचे जवळपास 48 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 670 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 47 हजार 638 रुग्णांचं निदान झालं आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 84 लाख 11 हजार 724 झाली आहे. तर कोरोनामुळे देशातील 1 लाख 24 हजार 985 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 77 लाख 65 हजार 966 जण कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासांत देशात 54 हजार 157 कोरोनातून बरे होऊन (discharges) घरी परतले आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये 5 लाख 20 हजार 773 कोरोना रुग्ण उपचार घेत (active cases) आहेत. 

आयटी इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा बदल; केंद्र सरकारकडून नियम शिथिल

 10 राज्यांत बिकट परिस्थिती-
देशातील कोरोना परिस्थिती पाहिली तर काही ठराविक राज्यांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. यामध्ये 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देशातील कोरोना रुग्णांपैकी 78.2 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक 21.53 टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळ (16.12), दिल्ली (7.08), पश्चिम बंगाल (6.87), कर्नाटक (6.76), छत्तीसगढ (4.31), उत्तरप्रदेश (4.30), आंध्रप्रदेश (4.06), तामिळनाडू (3.63), तेलंगणा (3.53) आणि राहिलेल्या इतर राज्यात 21.80 टक्के रुग्ण आहेत. 

दिवाळीनंतर येऊ शकते दुसरी लाट-
देशात मागील 24 तासांत कोरोनाच्या 12 लाख 20 हजार 711 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या तब्बल 11 कोटी 54 लाख 29 हजार 95 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवाळीनंतर देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

(edited by- pramod sarawale)