esakal | Corona updates: सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 4.5 लाखांच्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

देशात आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. दिल्लीत सध्या कोरोनाने कहर केला आहे.

Corona updates: सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 4.5 लाखांच्या पार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. दिल्लीत सध्या कोरोनाने कहर केला आहे. दिल्लीमध्ये दररोज जेवढ्या चाचण्या होत आहेत त्यापैकी 10 टक्के चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. तसेच कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत, तज्ज्ञांनी या नवीन रुग्णवाढीस कोरोनाची दुसरी लाट असंही म्हटलं आहे.

जगभरातील आकडेवारी पाहिली तर अमेरिकेसह युरोपातील काही देशांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहेत. युरोपातील बऱ्याच देशांनी लॉकडाउनही जाहीर केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाची सुरुवात ज्या चीनपासून झाली तो देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता पण आता चीनमध्येही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. चीनच्या उत्तरी राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे.

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे (COVID19) 44 हजार 489 रुग्णांचं निदान झालं असून 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाची 92 लाख 66 हजार 706 जणांना बाधा होऊन 1 लाख 35 हजार 223 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोरोना योद्ध्याचे निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 86 लाख 79 हजार 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांत 36 हजार 367 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशभरातील रुग्णालयात 4 लाख 52 हजार 344 रुग्ण उपचार घेत आहेत.

loading image