Corona Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 68 लाखांच्या वर; 78 हजार 524 नवीन रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विरुध्द लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन भारतीय नागरिकांना ट्विटरवरून केलं आहे. यामध्ये पंतप्रधान काही सुचना दिल्या आहेत आणि त्याचं पालन करण्याचंही आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 68 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 78 हजार 524 रुग्णांचं निदान झालं असून 971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 58 लाखांपेक्षा जास्त कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आतापर्यंत देशात 68 लाख 35 हजार 656 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. सध्या देशात कोरोनाचे 9 लाख 2 हजार 425 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे 1 लाख 5 हजार 526 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिली आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विरुध्द लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन भारतीय नागरिकांना ट्विटरवरून केलं आहे. यामध्ये पंतप्रधान काही सुचना दिल्या आहेत आणि त्याचं पालन करण्याचंही आवाहन केलं आहे.

- सगळ्यांनी मास्क घालावा.

-हात स्वच्छ धुवावे.

- सोशल डिस्टंसिंगचे नियमांचं पालन केलं पाहिजे. 

- 'दो गज की दुरी'चं नियम पाळा

- आपल्या सर्वांना मिळून कोरोनावर मात करायची आहे. 

- आपल्या सर्वांना मिळून कोरोना विरुध्दची लढाई जिंकायची आहे. 

 

बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या 11 लाख 94 हजार 321 चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे आता एकूण चाचण्यांची संख्या 8 कोटी 34 लाख 65 हजार 975 झाल्याची माहिती आयसीएसआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona count in India cross 68 lakh