खासगी दवाखान्यातील उपचारांसाठी दर निश्चित; मात्र वास्तव विदारक

Corona Patient
Corona PatientSakal

देशात सध्या कोरोना संकटाचं मोठ्या प्रमाणावर थैमान घालत आहे. अनेक रुग्णांना उपचारांसाठी दाखल केल्यानंतर मोठा खर्च पत्कारावा लागतो आहे. इतका मोठा खर्च करुनही रुग्ण वाचेलच याची कसलीच खात्री मात्र देता येत नाही. या आरोग्याच्या आणीबाणीमध्ये संपूर्ण देश मोठ्या संकटात असून याचे विदारक परिणाम प्रत्यक्ष वास्तवात दिसत आहे. काही खासगी हॉस्पिटल्स मनमानी कारभार करत मोठमोठी बिलं आकारत असून त्यामुळे अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या भरडून निघत आहेत, असं चित्र आहे.

कर्नाटकच्या रमेश गौडा यांना एका आठवड्यात आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमवावं लागलं. दोघांचाही उपचार म्हैसूरच्या एका प्रतिष्ठीत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुरु होता, ज्याठिकाणी त्यांना 16 लाखांचं बिल भरावं लागलं. मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना तालुक्यात राहणारे रमेश यांचं वय फक्त 25 वर्षे आहे. ते आपल्या वडिलांसोबत शेतीची देखरेख करतात. हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्यांची बचत कमी पडली. सगळे रुपये खर्च केले, त्यानंतर घरातील किंमती सामान विकावं लागलं. रमेश यांनी अतिव दु:खात सांगितलं की, मृतदेहांना स्विकारण्याआधी त्यांना हॉस्पिटलचं बिल भरावं लागलं आणि यासाठी त्यांना म्हैसूर-बेंगलुरु हायवे जवळील आपली दोन एक्कर जमीन विकावी लागली. रमेश यांनी म्हटलंय की, आता त्यांच्याजवळ काहीच शिल्लक नाहीये. आजारी आई आणि लहान बहिणीची जबाबदारी त्याच्यांवर आहे मात्र, त्यांच्याकडे ना जमीन शिल्लक आहे ना बचतीमध्ये पैसे... सोबतच त्यांना वडिल आणि भावाला देखील गमवावं लागलं.

Corona Patient
मोठा निर्णय! परदेशातील लशींच्या वापराचा मार्ग मोकळा

सरकारने दर निश्चित करुनही परिस्थिती विदारक

सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटल्समधील उपचारांचे दर निश्चित केले आहेत मात्र प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती मात्र वेगळी आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन 8 हजार रुपये, व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू बेडसाठी प्रतिदिन 9,750 रुपये आणि व्हेंटीलेटरसहित आयसीयू बेडसाठी प्रतिदिन 11,500 रुपये दर निश्चित केला गेला आहे. मात्र, वास्तावात प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये दररोज 20 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची वसूली सुरु आहे.

Corona Patient
ब्रिटनमध्ये जूलैनंतर पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

कोरोनातून वाचले पण आर्थिक स्थिती ढासळली

ज्या कुटुंबातील सदस्य बरे होतात त्यांची आर्थिक स्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर ढासळते, असं चित्र आहे. कोरोनाच्या कचाट्यातून आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मोठ्या खासगी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट केल्यानंतर रुग्ण बरा झालाच तर त्याच्या उपचारांसाठी आलेल्या खर्चाने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंगाल होण्याच्या अनेक कहाण्या सध्या दिसून येत असून वास्तव मोठं भीषण आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, अनेक लोक सरकारने निश्चित केलेल्या दरांपासून अनभिज्ञ आहेत. अशा तक्रारींचे निरीक्षण करणार्‍या नोडल हेल्थ ऑफिसरने सांगितले की ही अत्यंत निराशाजनक वेळ आहे आणि बऱ्याच लोकांना कोणत्याही खर्चाची चौकशी न करता कोणत्याही रुग्णालयात दाखल करावेसे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com