Corona Update : दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या ३०० वर

रुग्णांच्या जनुकीय आराखड्यावर भर देणार
corona delhi 300 covid infected arvind kejriwal hospital health
corona delhi 300 covid infected arvind kejriwal hospital health corona

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे चाचणीनंतरच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर (जनुकीय आराखड्यावर) लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ३०० झाली असून संसर्गाचे प्रमाण (पॉझिटिव्हीटी रेट) १० टक्क्यांवर गेला. त्यापार्श्वभूमीवर १० आणि ११ एप्रिलला सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत मॉक ड्रील घेतली जाणार असून विमानतळांवर दोन टक्के प्रवाशांची चाचणी घेण्यात येईल.

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन दिल्ली सरकारच्या आरोग्यविषयक तयारीचा आढावा घेतला. आजच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले, की कोरोना वाढणाऱ्या सहा राज्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली. यात दिल्लीचे नाव नव्हते.

१५ मार्चला दिल्लीत ४२ रुग्ण होते. ३० मार्चपर्यंत ही संख्या २९५ झाली आहे. आरोग्य यंत्रणेने २३६३ चाचण्या केल्या होत्या. मात्र चिंतेची गरज नसून योग्य उपाययोजना केल्या जातील, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. विषाणूंची लक्षणे समजण्यासाठी मागील दोन तीन आठवड्यांपासून सांडपाण्याची तपासणी केली जात आहे. लोकांनी घाबरू नये.

अद्याप मास्क सक्तीबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना नाहीत. मात्र आजारी असलेल्या व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची जिनोम सिक्वेन्सिंग केली जात असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार लसींना जुमानत नसल्याचेही आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाची तयारी विशद करताना केजरीवाल म्हणाले,की दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ७९८६ खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात ऑक्सिजन आणि आयसीयू खाटांचाही समावेश आहे. तर सरकारी प्रयोगशाळांमध्ये दररोज ४००० चाचण्यांची व्यवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com