कोरोनाशी पुन्हा लढावे लागेल, लॉकडाऊनबाबत देखील महत्वाची अपडेट - India Corona Update | Latest Marathi News | Breaking Marathi News | Maharashtra Covid 19 News Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Corona Update

India Corona Update : कोरोनाशी पुन्हा लढावे लागेल, लॉकडाऊनबाबत देखील महत्वाची अपडेट

Corona Update : देशात कोरोना बाधितांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाच्या 467 सक्रिय रुग्णांची वाढ झाली असून या आजारामुळे चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण सुरू असून या क्रमवारीत गेल्या 24 तासांत 7,673 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 7,026 वर पोहोचली आहे. 

देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,46,98,118 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 5,30,813 वर पोहोचली आहे. त्याच कालावधीत, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 662 ने वाढून 4,41,60,279 वर पोहोचली आहे.

दरम्यान मेदांता हॉस्पिटल गुरुग्रामचे संचालक नरेश त्रेहान यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नरेश त्रेहान म्हणाले, जग कोरोनापासून मुक्त झालेले नाही. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. यापूर्वी कोरोनाशी लढा दिल्याप्रमाणे पुन्हा लढावे लागेल, सध्या लॉकडाऊनची गरज नाही. (Latest Marathi News)

देशात गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 125 सक्रिय रुग्णांची वाढ महाराष्ट्रात झाली आहे. याशिवाय गुजरातमध्ये 106, दिल्ली 61, केरळ 52, तामिळनाडू 39, हिमाचल प्रदेश 25, राजस्थान 20, गोवा 16, हरियाणा 14, उत्तराखंड नऊ, कर्नाटक आठ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी पाच, जम्मू आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी चार, बिहार, चंदीगड आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, मेघालय, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये अनुक्रमे प्रत्येकी एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.(Marathi Tajya Batmya)

जगात कोविडची 94,000 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अजूनही ही जागतिक महामारी संपलेली नाही कारण नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

जगातील 19% प्रकरणे अमेरिकेतून, 12.6% रशियातून आणि 1% जगातील प्रकरणे आपल्या देशात आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे.