...म्हणून सोनिया गांधींनी मानले शेतकऱ्यांचे आभार!

...म्हणून सोनिया गांधींनी मानले शेतकऱ्यांचे आभार!

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीमुळे ओढावलेल्या  लॉकडाऊननंतर काय? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे. बुधवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत निधीसह उपाययोजनेबाबत केंद्र सरकारची पुढील रणनिती काय? असा प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केला आहे.  या चर्चेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी, अशोक गहलोत यांच्यासह अन्य काँग्रेसच्या नेत्यांसह पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पुदुच्चेरी राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होते. लॉकडाऊनची नामुष्की आणखी किती दिवस राहिल? कोणत्या मापदंडातून लॉकडाऊन कालावधी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जातो? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांनी 17 मेनंतर काय? लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेत असताना केंद्र सरकार कोणते मापदंड लावणार? यासारखे प्रश्न उपस्थितीत केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींनी मांडलेल्या प्रश्नाचे समर्थन केले. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर केंद्र सरकार कोणती पावले उचलणार याबाबत माहिती असणे, गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

यावेळी सोनिया गांधी यांनी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे खास आभार मानले. संकटजन्य परिस्थितीतही पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी भरघोस गव्हू उत्पादन करत अन्न सुरक्षेसाठी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांचे हे योगदान देशासाठी महत्वपूर्ण आहे, असे त्या म्हणाल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी 10 हजार कोटीच्या पॅकेजची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने याबाबत कोणताही पाठपुरावा केला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत बसून देशभरातील परिस्थितीचा अंदाज बांधू नये, असे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारने राज्याचा आढावा घेऊन आवश्यक निधी द्यावा, असे म्हटले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अनेक उद्योग-धंदे बंद असल्यामुळे कोरोनाचा नायनाट करत असताना अर्थिक संकटातही भर पडत आहे. केंद्र सरकारने ठोस भूमिका घेत देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठीची पुढील रणनिती स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसकडून होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com