व्वा! 'इथे' होणार अवघ्या दहा रुपयांत कोरोना रुग्णावर उपचार

व्वा! 'इथे' होणार अवघ्या दहा रुपयांत कोरोना रुग्णावर उपचार

हैदराबाद : सध्याच्या काळात दहा रुपयाला फारसे मूल्य राहिले नाही. दहा रुपयात एक किलो मीठ देखील येत नाही. परंतु हैदराबादचे डॉ. व्हिक्टर इम्यानूएल हे गेल्या तीन वर्षांपासून गरीब रुग्णांकडून केवळ दहा रुपये तपासणी शुल्क आकारत आहेत. सध्या कोरोनाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले जात असताना या ठिकाणी केवळ दहा रुपयांतच गरीब रुग्णांना कोविडवरील उपचाराचर सल्ला दिला जात आहे. हैदराबादच्या उप्पल डेपोजवळ क्लिनिक असून डॉ. व्हिक्टर हे पांढरे रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा कार्ड असलेल्या लोकांना दहा रुपये तर जवानांवर मोफत उपचार करत आहेत.

व्वा! 'इथे' होणार अवघ्या दहा रुपयांत कोरोना रुग्णावर उपचार
2020-21 आर्थिक वर्षात GDP मध्ये 7.3 टक्क्यांची घसरण

डॉ. व्हिक्टर इम्यानूएल म्हणतात, गरिबांची सेवा करता यावी म्हणून उपचाराचे शुल्क केवळ दहा रुपये ठेवले आहे. समाजातील मागासलेले घटक आणि पांढरे शिधाधारक आणि अन्न सुरक्षा कार्ड असणाऱ्या लोकांसाठी हे शुल्क ठेवण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी, ॲसिड हल्ल्याला बळी ठरलेले नागरिक, अनाथ, दिव्यांग, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील माफक दरात सेवा दिली जात आहे. विविध वैद्यकीय चाचण्या, औषधाच्या किमती देखील कमी ठेवल्या आहेत. डॉ. व्हिक्टर हे मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारावर औषधोपचार करतात. सध्याच्या कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालये आणि दवाखान्याकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. परंतु डॉ. व्हिक्टर हे कोरोनाच्या रुग्णावर केवळ दहा रुपयात उपचार करत असून ते होम आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी मदत करत आहेत. ते दररोज शंभर रुग्णांवर उपचार करतात, मात्र सध्या कोविडमुळे रुग्णांची संख्या वाढली असून दररोज १४० रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या वर्षभरात वीस ते २५ हजार कोरोना रुग्णावर उपचार केल्याचा दावा डॉ. व्हिक्टर केला आहे.

व्वा! 'इथे' होणार अवघ्या दहा रुपयांत कोरोना रुग्णावर उपचार
वेब ब्राऊजिंगची सुरुवात करणारं ‘इंटरनेट एक्सप्लोअरर’ अखेरच्या घटका का मोजतंय?

आयुष्याला कलाटणी देणारी घटना
एकदा एक महिला रुग्णालयासमोर उपचारासाठी पैसे नसल्याने भीक मागत होती. तिच्या पतीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. या घटनेने डॉ. व्हिक्टर यांच्या आयुष्यावर सखोल परिणाम झाला आणि तेथून त्यांनी कमी पैशात लोकांवर उपचार करण्याचे ठरवले. डॉक्टरांना अनेक जण विचारतात, की दहा रुपये घेण्यापेक्षा मोफत उपचार का करत नाहीत. यावर डॉक्टर म्हणाले, की दहा रुपये घेण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे एखाद्या रुग्णाच्या मनात दयेपोटी आपल्यावर उपचार करत असल्याची भावना निर्माण होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आत्मसन्मान राखण्यासाठी दहा रुपये महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.‘ स्नेह हस्तथम ’ नावाखाली ते गरीब आणि गरजू लोकांना अन्न देत आहेत. अधिकाधिक रुग्णांना उपचार घेता यावे यासाठी धर्मादाय रुग्णालय सुरू
करणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com