esakal | देशातील बाधित २० हजारांवर; विविध राज्यांतील मृतांमध्ये ६४ ते ७० टक्क्यांची वाढ 

बोलून बातमी शोधा

देशातील बाधित २० हजारांवर; विविध राज्यांतील मृतांमध्ये ६४ ते ७० टक्क्यांची वाढ 

देशातील एकूण मृतांमध्ये महाराष्ट्र,दिल्ली,गुजरात आणि मध्यप्रदेश या चार राज्यांमधील मृतांची संख्या तब्बल ६४ते७०टक्के असल्याचे एका निरीक्षणातून समोर आले आहे.

देशातील बाधित २० हजारांवर; विविध राज्यांतील मृतांमध्ये ६४ ते ७० टक्क्यांची वाढ 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याचा गुणाकार होण्याची भीती खरी ठरत असून आज संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या २० हजार ४७१, तर मृतांची संख्या ६४१ वर पोचली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ९६० रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्यप्रदेश या चार राज्यांमधील मृतांची संख्या तब्बल ६४ ते ७० टक्के असल्याचे एका निरीक्षणातून समोर आले आहे. दरम्यान निकृष्ट रॅपिड टेस्टिंग किट पुरविल्या प्रकरणी चीनमधील 'गुआंगझोऊ बायोटेक व झुहाई लिवजोन या दोन कंपन्या केंद्र सरकारच्या रडारवर आल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या चारच राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४० च्या पुढे असल्याचे आढळल्याने या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये ५२२१ रुग्णसंख्येबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही २५१ इतकी आहे. राज्यात ७२२ लोक बरे झाले आहेत. गुजरातमध्ये कालच्या एकाच दिवसात १९ जण मृत्युमुखी पडले आणि एकूण संख्या ९० वर पोचली आहे. मध्य प्रदेशात ७६ लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाबतची माहिती मिळविण्यासाठी आणि मदतीसाठी केंद्र सरकारने आज आणखी एक हेल्पलाइन नंबर जारी केला तो असा : ९१-११-२३९७८०४६. 

पत्रकार परिषदा रद्द 
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सरकारने देशभर लॉकडाउन जाहीर केले होते, मात्र अशा स्थितीतही मंत्रालयातर्फे पत्रकार परिषद घेण्यात येत असे. गेले सुमारे महिनाभर आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल हे पत्रकार परिषद घेत असत. त्यांच्यासह डॉ गंगाखेडकर आणि गृहमंत्रालयाचे अधिकारीदेखील पत्रकारांना माहिती देत असत . मात्र आता या रोजच्या पत्रकार परिषदा बंद करण्याचे केंद्राने ठरविले आहे पत्रकार परिषद आता आठवड्यातून फक्त सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार असे चारच दिवस होईल. आयसीएमआर निवेदने शनिवार रविवार आणि बुधवार अशी तीन दिवस जाहीर केली जातील.